जिल्हा परिषदेसाठी मतदान यंत्रे रवाना
By Admin | Updated: February 21, 2017 01:54 IST2017-02-21T01:54:01+5:302017-02-21T01:54:16+5:30
नाशिक तालुक्यासाठी २६० मतदान यंत्रे

जिल्हा परिषदेसाठी मतदान यंत्रे रवाना
नाशिक : जिल्हा परिषदेच्या नाशिक तालुक्यातील आठ गण व चार गटांसाठी सोमवारी (दि.२०) पंचायत समितीच्या कार्यालयातून मतदान यंत्रे व साहित्य सकाळीच रवाना करण्यात आले. तालुक्यात एकूण १३० मतदान केंद्रे असून, त्यासाठी २६० मतदान यंत्रे पुरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेश महाजन यांनी दिली.तालुक्यात गिरणारे, गोवर्धन, पळसे व एकलहरे या चार गटांसाठी तसेच गिरणारे, देवरगाव, गोवर्धन, विल्होळी, पळसे, सिद्धप्रिंपी, एकलहरे व लहवित या आठ गणांसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान होणार आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. नाशिक तालुक्यासाठी नियुक्त केलेल्या सुमारे ७५० अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता नाशिक तालुका पंचायत समिती कार्यालयात बोलावून निवडणुकीचे साहित्य तसेच मतदान यंत्रे सील करून ताब्यात देण्यात आली. तालुक्यात एकूण १३० मतदान केंद्रे असून, त्यासाठी २६० मतदान यंत्रे (मतपेट्या)पुरविण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर चार ते पाच कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. पंचायत समिती कार्यालयात अधिग्रहीत करण्यात आलेल्या चारचाकी वाहनातून मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी निवडणूक साहित्यासह नेमून दिलेल्या ठिकाणी रवाना झाले आहेत. सायंकाळी नियोजित ठिकाणी पोहोचल्यावर त्यांचा मतदान केंद्रावरच मुक्काम राहणार आहे. मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सदर साहित्य नियोजित ठिकाणी जमा करण्यात येतील. गुरुवारी (दि.२३) सकाळी दहा वाजता पंचायत समिती कार्यालयात मतमोजणीस सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)