दिंडोरीत मतदार जनजागृती रॅली

By Admin | Updated: September 26, 2014 23:54 IST2014-09-26T23:53:50+5:302014-09-26T23:54:09+5:30

दिंडोरीत मतदार जनजागृती रॅली

Voters' awareness rally in Dindori | दिंडोरीत मतदार जनजागृती रॅली

दिंडोरीत मतदार जनजागृती रॅली

दिंडोरी : येथे निवडणूक विभाग, तहसील कार्यालय व मविप्र महाविद्यालयातील रासेयोच्या विद्यार्थ्यांनी मतदानाची शपथ घेऊन शहरातून मतदार जनजागृती रॅली काढली. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता दिंडोरी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्रावर केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरीचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिंडोरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना मतदार जागृतीविषयक उद्बोधन केले. दिंडोरी - पेठ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी मुकेश भोगे यांनी विद्यार्थी व उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली.







तसेच जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक- श्री.राजेंद्र उगले यांनी स्वरचीत मतदार जागृती विषयक पोवाड्याचे गायन केले. व त्यानंतर या विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत दिंडोरी शहरातुन मतदार जागृती फेरी काढली. यावेळी दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी श्री- मुकेश भोगे, तहसीलदार- मंदार कुलकर्णी, ना. तहसीलदार- श्रीमती कुलकर्णी, पुरवठा अधिकारी- श्री. पोतदार, गटशिक्षणाधिकारी- माधवराव पाटील, प्राचार्य- पी एन नाठे, सर्कल बागुल ,तलाठी बोरु डे , संतोष कथार, महेंद्र पैठणे , प्रा.संतोष दळवी, प्रा. शरद झोटींग, प्रा. सौ.सविता उफाडे, प्रा.कु.भारती ठाकरे, तुषार वाघ ,सचिन देशमुख ,अनिल सातपुते , विद्यापीठ प्रतिनीधी- अजय शिंदे आदिंसह मविप्र कला वाणज्यि व विज्ञान महाविद्यालयातील रासेयो चे विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थीत होते.

Web Title: Voters' awareness rally in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.