जनता विद्यालयातर्फे मतदार जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 18:50 IST2019-03-24T18:49:53+5:302019-03-24T18:50:26+5:30
मेशी : येथील जनता विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले.

मेशी येथील जनता विद्यालयात मतदार जनजागृती मोहिमेत सहभागी शिक्षक आणि विद्यार्थी.
ठळक मुद्दे विद्यार्थी व शिक्षक, कर्मचारी यांनी गावातून सायकल रॅली
मेशी : येथील जनता विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले.
आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, कर्मचारी यांनी गावातून सायकल रॅली काढली.
रॅली विद्यालयापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्र, धोबीघाट, शिवाजी नगर ते गावातील गल्लीबोळातही रॅली काढण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या. तसेच घोषवाक्य असलेले फलक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी प्राचार्य डी. जे. रणधीर, उपमुख्याध्यापक ओतारी आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले उपस्थित होते.