इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये मतदार जागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 19:20 IST2019-04-05T19:19:36+5:302019-04-05T19:20:21+5:30
अंदरसुल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये मतदार जागृती मोहीम राबवण्यात आली.

इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये मतदार जागृती मोहीम
अंदरसुल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये मतदार जागृती मोहीम राबवण्यात आली.
१७ व्या लोकसभेसाठी मतदार मतदान करणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात निवडणूक होणार आहे. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी स्कुलचे प्रिन्सिपल अल्ताफ खान होते. प्रमुख पाहुणे रामनाथ एंडाईत होते. अध्यक्षीय भाषणांत अल्ताफ खान यांनी मतदानाचा हक्क १८ वर्षावरील सर्व स्त्री-पुरु ष यांनी बजवावा असे नमूद केले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी मतदारांनो मतदान करा असा संदेश दिला.
याप्रसंगी जालिंदर म्हस्के, गणेश सोनवणे, अजहर खतीब, दीपक खैरनार, शिवाजी झांबरे, रोहिदास ठाकरे, प्रशांत बिवाल, अमोल वडनेरे, अमजद अंसारी, संतोष जाधव, सुनीता वडे, ममता खेरुड, वैशाली बागुल, चेतना माकूने आदीसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.