ओझर येथे मतदार नोंदणी आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 08:42 PM2019-07-23T20:42:09+5:302019-07-23T20:42:34+5:30

ओझर : बीएलओबीएलए आणि विविध राजकीय पक्षांच्या उपस्थितीत आयोजित मतदार नोंदणी आढावा बैठक निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

Voter Registration Review Meeting at Ozar | ओझर येथे मतदार नोंदणी आढावा बैठक

ओझर येथे मतदार नोंदणी आढावा बैठक

Next
ठळक मुद्देमतदार याद्यांचे काम करीत असतांना अडचण आल्यास थेट आपल्याला संपर्क करण्याचे आवाहन केले.

ओझर : बीएलओबीएलए आणि विविध राजकीय पक्षांच्या उपस्थितीत आयोजित मतदार नोंदणी आढावा बैठक निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
कोणताही मतदार मतदानापासुन वंचित रहाणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन अर्चना पठारे यांनी या प्रसंगी केले. येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या सभागृहात बीएलओबीएलए आणि विविध राजकीय पक्षांच्या उपस्थितीत आयोजित मतदार नोंदणी आढावा बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार दिपक पाटील ओझर विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती प्रशांत पगार, उपसरपंच रज्जाक मुल्ला, ग्रा. पं. सदस्य प्रकाश महाले आदि उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी पठारे यांनी दुबार मतदारांचे नावे वगळण्याची सुचना करीत मतदार याद्यांचे काम करीत असतांना अडचण आल्यास थेट आपल्याला संपर्क करण्याचे आवाहन केले.
मतदार नोंदणी आणि तत्सम कामात कोणी कुचराई केल्यास त्यावर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. तहसीलदार दिपक पाटील यांनी मतदार आढावा बैठिकची भुमिका विषद करीत राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि स्थानिक बी एल ओ यांनी समन्वय ठेऊन काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी भास्कर शिंदे, सुरेश कदम, प्रकाश महाले, प्रशांत पगार, श्रीराम आढाव, नितीन जाधव आदिंनी मतदार याद्यांबाबत शंका उपस्थित करीत प्रत्येक निवडणुकीला मतदारांचे नावे अचानक गायब होत असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन दिले. तर बी एल ओ ना त्यांच्याच भागातील मतदार याद्यांचे कामे देण्यात यावे तसेच मतदार नोंदणीचा अर्ज करून देखील मतदार यादीत नाव येत नाही अशा तक्र ारी उपस्थित नागरीकांनी केल्या.
या बैठकीस भास्कर शिंदे, सुकदेव चौरे, सदस्य संजय पगार, सुरेश कदम, वसंत भडके, शरद शेजवळ, दिलीप कदम, कामेश शिंदे, श्रीराम आढाव, नितीन जाधव, विशाल मालसाने, दिपक श्रीखंडे त्र्यंबकराव पगार, भारत मोरे, नंदकुमार पगार, राजेंद्र सोनवणे, नामदेव गुरूळे, अनिल गवळी आदी उपस्थित होते.

(फोटो २३ ओझर)
ओझर येथे मतदार नोंदणी आढावा बैठकीत बोलतांना प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार दिपक पाटील आदी.

Web Title: Voter Registration Review Meeting at Ozar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.