उपनगर येथे मतदार नोंदणी अभियान
By Admin | Updated: October 11, 2015 21:46 IST2015-10-11T21:45:55+5:302015-10-11T21:46:27+5:30
उपनगर येथे मतदार नोंदणी अभियान

उपनगर येथे मतदार नोंदणी अभियान
उपनगर : मातोश्रीनगर येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी नवीन मतदार नाव नोंदणी अभियान राबविण्यात आले.
उपनगर परिसरातील पदवीधर मतदारांचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याकरिता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी घरोघर नाव नोंदणीच्या अर्जाचे वाटप करण्यात आले होते. शनिवारी मातोश्रीनगर येथे पदवीधर मतदार नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्याबरोबर अनेक मतदारांचे अर्ज भरून घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहर चिटणीस राहुल सोनवणे, योगेश कपिले, पीयूष शिंदे, सुनील सूर्यवंशी, योगेश त्रिभुवन, नीलेश वाणी, शरद नेवे, पप्पू खरे, प्रदीप विश्वकर्मा आदि उपस्थित होते. (वार्ताहर)