जिल्ह्यात मतदार नोंदणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 03:07 PM2017-10-04T15:07:16+5:302017-10-04T15:08:08+5:30

Voter registration begins in district | जिल्ह्यात मतदार नोंदणी सुरू

जिल्ह्यात मतदार नोंदणी सुरू

googlenewsNext
ठळक मुद्दे३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, नाव-पत्त्यात बदल, मतदारसंघाचे स्थलांतर आदी बदल करण्यासाठी मतदारांना अर्ज भरून देण्याची संधी आहे.दि. ८ व २२ आॅक्टोबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी नवीन मतदार नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली असून, त्यासाठी प्रत्येक निवडणूक अधिकाºयाकडे मतदार नोंदणीचे अर्ज ठेवण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यात ४२ लाख ९७ हजार ५२२ इतके मतदार असून, त्यात २२,५८,५५६ पुरुष, तर २०,३८,८९४ महिला मतदार आहेत. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विशेष मतदार पुनरीक्षण मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. ३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, नाव-पत्त्यात बदल, मतदारसंघाचे स्थलांतर आदी बदल करण्यासाठी मतदारांना अर्ज भरून देण्याची संधी आहे. या मोहिमेत दि. ८ व २२ आॅक्टोबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर या दिवशी मतदार नोंदणी करण्याची सोय मतदारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Web Title: Voter registration begins in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.