वटार प्राथमिक शाळेत मतदान जनजागृती फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 17:17 IST2019-04-08T17:17:45+5:302019-04-08T17:17:57+5:30
वटार : बागलणाच्या पश्चिम पट्ट्याातील आदर्श गाव वटार. नावलौकिकाला शोभेल असेच उपक्र मही आदर्शच. लोकशीच्या बळकटीकरणासाठी मतदान अवश्य करा, ...

वटार प्राथमिक शाळेत मतदान जनजागृती फेरी
वटार : बागलणाच्या पश्चिम पट्ट्याातील आदर्श गाव वटार. नावलौकिकाला शोभेल असेच उपक्र मही आदर्शच. लोकशीच्या बळकटीकरणासाठी मतदान अवश्य करा, अशा विद्यार्थ्यांनी घोषणा देत गावातून मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. काढण्यात आलेल्या मतदान जनजागृती फेरीत अनेक विद्यार्थ्यांसह आबालवृद्ध सहभागी झाले होते. महिला वर्गाने मतदान जनजागृती फेरीचे स्वागत केले.
नवमतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण
लोकशाहीसाठी पहिल्यांदाच मतदान करत असल्यामुळे नवीन मतदारांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. लोकसभेची निवडणूक म्हणजे गावात राष्टÑीय उत्सवच झाला आहे. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांनीदेखील मतदान जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या रॉलीमध्ये मुख्याध्यापक कैलास काकुळते, प्रकाश देवरे, देवीदास अहिरे, सावित्री देवरे आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते.
फोटो नावे : वटार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान जनजागृती फेरीत सहभागी झालेले शिक्षक व विद्यार्थी (08 वटारमतदार जागृती)