रेडगावला चिमुकल्यांची मतदार जनजागृती
By Admin | Updated: September 28, 2014 22:48 IST2014-09-28T22:48:07+5:302014-09-28T22:48:38+5:30
रेडगावला चिमुकल्यांची मतदार जनजागृती

रेडगावला चिमुकल्यांची मतदार जनजागृती
रेडगाव खुर्द : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात फेरी काढून मतदार जागृती केली. मुख्याध्यापक वाल्मीक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील चिमुकल्यांनी मतदार जागृतीचे फलक घेऊन गावातून फेरी काढली. यादरम्यान मतदान करणे राष्ट्रीय काम आहे. मतदान करा-मतदान करा, मतदानाचा पवित्र हक्क बजवा अशा विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनी मतदार जागृती केली.