व्होट फॉर नाशिक

By Admin | Updated: February 21, 2017 01:26 IST2017-02-21T01:26:08+5:302017-02-21T01:26:23+5:30

आज मतदान : १०,७३,४०८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Vote for Nashik | व्होट फॉर नाशिक

व्होट फॉर नाशिक

नााशिक : मुंबई- पुण्याच्या पाठोपाठ परंतु तितकेच मोठे महानगर होण्याच्या दृष्टीने झेपावत असलेल्या नाशिक शहराचे भवितव्य घडवणारी नाशिक महापलिकेची सार्वत्रिक निवडणूक मंगळवारी (दि.२१) होणार आहे. मूलभूत सुविधांबरोबर शहराचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी होणारी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. नाशिक महानगरपालिकेची ही सहावी पंचवार्षिक निवडणूक आहे. शहर चहूबाजूने विकसित होत असताना त्याचा नियोजनबद्ध विकास व्हावा अशीच नागरिकांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीनेच सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका मांडल्या असल्या तरी शहराची सूत्रे कोणाकडे सोपवायचे याचा फैसला करणारी ही निवडणूक ठरणार आहे. त्यादृष्टीने व्होट फॉर नाशिक अशा अर्थाने निवडणूक असणार आहे.  या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, निवडणूक शांततेत आणि भयमुक्तवातावरणात पार पडावी यासाठी महापालिकेबरोबरच पोलीस यंत्रणाही तयार आहे. महापालिकेच्या १२२ जागांसाठी मंगळवारी सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू होणार असून, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालेल. (प्रतिनिधी)

Web Title: Vote for Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.