व्हॅनचालकाने केला शाळकरी मुलींवर अत्याचार
By Admin | Updated: September 23, 2015 00:29 IST2015-09-23T00:29:37+5:302015-09-23T00:29:58+5:30
व्हॅनचालकाने केला शाळकरी मुलींवर अत्याचार

व्हॅनचालकाने केला शाळकरी मुलींवर अत्याचार
नाशिक : शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचालकाने सोमवारी (दि़ २१) शाळा सुटल्यानंतर आपल्या पाच वर्षीय मुलीसह तिच्या दोन मैत्रिणींना चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची फिर्याद मुलीच्या आईने गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित स्वप्निल जुन्नरे यास अटक केली असून न्यायालयाने त्यास २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रमिकनगर परिसरातील तीन अल्पवयीन मुली महात्मानगर परिसरातील एका शाळेत जातात़ त्यांना नियमित शाळेत घेऊन जाण्याचे काम करणारा स्कूलबस व्हॅनचालक संशयित स्वप्निल किशोर जुन्नरे (३०, रा़अष्टविनायक कॉलनी, शिवाजी पार्क, अशोकनगर, सातपूर) सोमवारी मुलींना शाळेत घेऊन गेला़ अकरा वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर या मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून तो कृषीनगर जॉगिंग ट्रॅकजवळील उद्यानाजवळ घेऊन गेला व त्यांच्यावर अत्याचार केला़ तसेच ही गोष्ट आईवडिलांना सांगितल्यास मारण्याची धमकी दिली़
हा प्रकार मुलींनी घरी आल्यानंतर सांगितल्यानंतर श्रमिकनगरमधील पालकांनी तत्काळ गंगापूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ त्यानुसार संशयित स्वप्निल जुन्नरेवर लहान मुलांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली़ त्यास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ या प्रकरणी अधिक तपास गंगापूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक सरिता जाधव करीत आहेत़ (प्रतिनिधी)