व्हॉलीबॉल स्पर्धा जिल्हा निवड चाचणी १६ ला
By Admin | Updated: October 13, 2014 00:46 IST2014-10-12T21:51:15+5:302014-10-13T00:46:39+5:30
व्हॉलीबॉल स्पर्धा जिल्हा निवड चाचणी १६ ला

व्हॉलीबॉल स्पर्धा जिल्हा निवड चाचणी १६ ला
नाशिक - जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी युथ आणि ज्युनिअर गटांच्या निवडचाचणी स्पर्धेचे गुरुवार (दि़ १६)आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे सचिव दिवाकर गायकवाड यांनी दिली़
गुरुवारी दुपारी ३ वाजता मेहेर सिग्नल जवळील मित्रविहार स्पोर्ट क्लब येथे या निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत़ यूथ गटासाठी जानेवारी १९९४ नंतरची जन्मतारीख असलेले तर ज्युनिअर गटासाठी जानेवारी १९९७ नंतरची जन्मतारीख असलेल्या खेळाडूंनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे आनंद खरे, रामदास होते यांनी केले आहे़