येवल्यात मतदारांमध्ये उत्साह

By Admin | Updated: February 22, 2017 01:57 IST2017-02-22T01:56:57+5:302017-02-22T01:57:11+5:30

सकाळपासून रांगा : सर्वाधिक मतदान अंदरसूल गटात; सर्वात कमी नगरसूलला

Voices in Yeola | येवल्यात मतदारांमध्ये उत्साह

येवल्यात मतदारांमध्ये उत्साह

येवला : येवला पंचायत समतिी आण िजिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीने मतदान झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. सरासरी ७२.५० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी मधुमती सरदेसाई (राठोड), सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नरेशकुमार बहिरम यांनी दिली. सर्वात कमी मतदान खिर्डी साठे (५३.१७) येथे,तर सर्वाधिक मतदान राजापूरच्या एका मतदान केंद्रावर (९१.१२) या मतदान केंद्रावर झाले .या निवडणुकीत मतदारांचा उदंड उत्साह दिसून आला. मतदाराजाला मतदान केंद्रापर्यंत पोहोचिवण्यासाठी गावोगावी वाहनांची व्यवस्था केली होती. मंगळावरी उन्हाचा तडाखा जाणवला.तरीही मतदारांनी रांगा लावून मतदान केले. अनेक गावांमध्ये माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य,ग्रामपंचायत सरपंच, सहकाराच्या राजकारणातील मातब्बर मंडळींनी ठिय्या मारला होता. संवेदनशील गावांमध्ये राजकीय मंडळी विशेष दक्षता घेत होते.चुरशीने झालेल्या मतदानात तालुक्यातील १५०६०४ मतदारांपैकी १०९१९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
येवला तालुक्यात सरासरी ७२.५० टक्के मतदान झाले. तालुक्यात ७०३१० स्त्रीयांपैकी ४९६५७ स्त्रीयांनी मतदान केले. तर ८०२९४ पुरूष मतदारांपैकी ५९५३८ पुरूषांनी मतदानाचा हक्क बजावला. अंदरसूल,मुखेड,पाटोदा ,नगरसूल आण िराजापूर येथे चुरशीने मतदान झाले. येवला तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ५ गटातील पंचायत समतिीच्या १० गणामधून १० जागासाठी ६४ उमेदवारांचे भवितव्य एव्हीएममध्ये बंद झाले आहे.

Web Title: Voices in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.