एकापेक्षा जास्त स्वीय सहायकांमुळे उपाध्यक्ष गोत्यात शासन निर्णयाचे उल्लंघन
By Admin | Updated: November 21, 2014 00:34 IST2014-11-21T00:25:33+5:302014-11-21T00:34:28+5:30
: सभापतीला साधा शिपाई मिळेना

एकापेक्षा जास्त स्वीय सहायकांमुळे उपाध्यक्ष गोत्यात शासन निर्णयाचे उल्लंघन
नाशिक : कॉँग्रेसला धोबीपछाड देऊन उपाध्यक्ष बनलेले राष्ट्रवादीचे बांधकाम व अर्थ सभापती तथा उपाध्यक्ष प्रकाश वडजे एक दोन नव्हे, तर तब्बल तीन तीन स्वीय सहायक दिमतीला ठेवल्यामुळे गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. तिकडे साधा शिपाई मिळावा म्हणून मागणी करणाऱ्या किरण पंढरीनाथ थोरे यांना मात्र प्रशासनाने नियमावर बोट ठेवत तिष्टत ठेवल्याची चर्चा आहे. दरम्यान, नियमानुसारच कामकाज व्हावे म्हणून मग किरण थोरे यांनी स्वीय सहायक व शिपाई देण्याबाबत शासन निर्णयाची माहिती घेतली असता, ३ एप्रिल १९९७ च्या सामान्य प्रशासन विभागाच्याच एका शासन निर्णयानुसार उपाध्यक्षांसह अन्य चार विषय समिती सभापतींना एक वरिष्ठ सहायक व दोन शिपाई देण्याचीच सोय असल्याचे आढळून आले आहे. सद्यस्थितीत उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी अधिकृत पत्र देऊन स्वीय सहायक म्हणून सचिन पाटील यांची मागणी केल्यानुसार प्रशासनाने त्यांना तत्काळ सचिन पाटील यांची स्वीय सहायक म्हणून नियुक्ती केली होती. दरम्यानच्या काळात मागील उपाध्यक्षांच्या काळात दोन दोन स्वीय सहायक असल्याची कुणकुण लागल्याने उपाध्यक्षांनी दोन नव्हे तर तीन स्वीय सहायक नेमणुकीसाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा होती. पाटील यांच्या व्यतिरिक्त काही दिवसांपूर्वीच पदाधिकाऱ्यांना अरेरावी केल्याने आणि संमतीविनाच कोट्यवधींची कामे मंजूर केल्याने निलंबनाला सामोरे गेलेल्या एका कर्मचाऱ्यासह अन्य एका विभागातील एक कर्मचारी असे दोन्ही कर्मचारी उपाध्यक्षांचे स्वीय सहायक म्हणून काम करीत असल्याचे अन्य पदाधिकाऱ्यांच्या नजरेस पडले