विवेकानंद मैदान बनले अनधिकृत वाहनतळ

By Admin | Updated: April 18, 2016 00:03 IST2016-04-17T23:09:01+5:302016-04-18T00:03:26+5:30

प्रभाग ४३ : हातगाडी व्यावसायिकांचीही वाढली गर्दी

Vivekananda ground became an unauthorized parking lot | विवेकानंद मैदान बनले अनधिकृत वाहनतळ

विवेकानंद मैदान बनले अनधिकृत वाहनतळ

 सिडको : येथील प्रभाग ४३ मधील स्वामी विवेकानंदनगर येथील मोकळ्या मैदानावर गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भूखंडाला संरक्षण भिंत बांधण्याचा प्रश्न अजूनही रेंगाळल्यामुळे मैदानाचा वापर अनधिकृत पार्किंगसाठी होत आहे. याप्रकरणी नागरिकांनी आयुक्तांनादेखील निवेदन दिले असून, संरक्षण भिंतीची मागणी केली आहे.
स्वामी विवेकानंदनगर मोकळे मैदानास संरक्षक भिंत नसल्याने मैदानाचा वापर हा वाहने पार्किंगसाठी होत आहे. तसेच मैदानालगत सायंकाळच्या सुमारास हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांचाही वावर दिसून येत आहे. यात दिवसेंदिवस भर पडत आहे.
स्वामी विवेकानंदनगर येथील मैदान हे सिडको प्रशासनाच्या ताब्यात आहे. सहावी योजना हस्तांतरित करताना सिडको सदरची जागा मनपाकडे हस्तांतरित करणार असल्याचे समजते. परंतु आज या मैदानाची देखभालअभावी दुरवस्था झाली आहे. मैदानाच्या चोहोबाजूने वाहनपार्किंग केली जात असल्यामुळे अतिक्रमणाचाही मुद्दा पुढे आला आहे.
दरम्यान, सदरच्या मैदानास संरक्षक भिंत बांधण्याबाबत सिडको आणि महापालिका यांच्यात एकमत होणे अपेक्षित आहे. तांत्रिक कारणांमुळे सिडकोच्या ताब्यातील या मैदानास संरक्षण भिंत करणे अद्याप शक्य झालेले नाही. सदर मैदानास मनपाच्या माध्यमातून संरक्षक भिंत उभारून त्याठिकाणी मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. दरम्यान, याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवकांनीदेखील मनपाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)

Web Title: Vivekananda ground became an unauthorized parking lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.