Vivek Sharma, Yalsee Verma winners in golf competition | गोल्फ स्पर्धेत विवेक शर्मा,यालसी वर्मा विजेते

गोल्फ स्पर्धेत विवेक शर्मा,यालसी वर्मा विजेते

ठळक मुद्देया स्पर्धेच्या व्यावसायिक गटात आशिष करोसिया व यालसी वर्मा यांनी अनुक्र मे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सूरज यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. हौशी गटात कर्नल विवेक शर्मा व रिभव वर्मा यांनी अनुक्र मे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला.

 
निफाड :येथील रिव्हरसाईड गोल्फ कोर्सवर रंगलेल्या गोल्फ स्पर्धेत राज्यभरातील नामवंत खेळाडूंनी हजेरी लावली. नाशिक जिल्हा गोल्फ संघटना, जिल्हा क्रीडाआधिकारी कार्यालय व निफाड येथील रिव्हरसाईड गोल्फ कोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत लेफ्ट.कर्नल विवेक शर्मा व यालसी वर्मा यांनी उत्कृष्ठ खेळ करून पारितोषिके मिळविली.
या स्पर्धेचे पारितोषिक लेफ्ट.जनरल आर. एस.सलारिया(परम विशिष्ठ सेवा मेडल,विशिष्ठ सेवा मेडल)व जिल्हाक्रीडा आधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेच्या व्यावसायिक गटात आशिष करोसिया व यालसी वर्मा यांनी अनुक्र मे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. सूरज यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. हौशी गटात कर्नल विवेक शर्मा व रिभव वर्मा यांनी अनुक्र मे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. ही स्पर्धा बघण्यासाठी आलेले क्रीडा संचालक ओमप्रकाश बोकारिया यांनी निफाड रिव्हरसाईड गोल्फ कोर्सवर गोल्फ अकॅडमी करण्यास हिरवा कंदिल दिला असल्याची माहिती जिल्हा क्रीडा आधिकारी रवींद्र नाईक यांनी यावेळी सांगितले. राजीव देशपांडे यांनी पारितोषिक वितरण समारंभाचे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वींग कमांडर प्रदीप बागमार, नितीन हिंगमिरे, स्रेहल देव, सैय्यद हाम्जा,खंडू कोटकर आदिंनी परिश्रम घेतले.

Web Title:  Vivek Sharma, Yalsee Verma winners in golf competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.