इगतपुरीतील विवांत रिसाॅर्ट अखेर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST2021-06-01T04:12:20+5:302021-06-01T04:12:20+5:30
इगतपुरी : तालुक्यातील मौजे तळेगाव शिवारात मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेले पंचतारांकित हॉटेल विवांत रिसॉर्टमध्ये शासन नियम धाब्यावर ठेवून गेल्या ...

इगतपुरीतील विवांत रिसाॅर्ट अखेर सील
इगतपुरी : तालुक्यातील मौजे तळेगाव शिवारात मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेले पंचतारांकित हॉटेल विवांत रिसॉर्टमध्ये शासन नियम धाब्यावर ठेवून गेल्या दोन दिवसांत सुमारे दोनशे-तीनशे लोकांच्या गर्दीत लग्न सोहळे साजरे करण्यात आले. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिल्यानंतर सदर रिसॉर्ट सीलबंद करण्यात आले आहे.
रिसॉर्ट व्यवस्थापनाला प्रारंभी दि. २९ रोजी एका लग्न सोहळ्याप्रकरणी २० हजार रुपयांचा दंड आकारत कारवाई करण्यात आलेली होती. तरीदेखील शासन कारवाईला न जुमानता रिसॉर्ट मालक व व्यवस्थापनाने दि. ३० रोजी पुन्हा एक लग्न सोहळा याच ठिकाणी शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीत पार पाडत शासन नियमांना केराची टोपली दाखविली होती. सदर माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना मिळताच त्यांनी विवांत रिसॉर्टमध्ये लग्न सोहळ्यास गर्दी केल्याने व शासन नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी सोमवारी (दि.३१) पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशाने तातडीने पोलीस उपनिरीक्षक अर्जुन भोसले व तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विवांत रिसॉर्टचे मालक अवतारसिंग हरनामसिंग शेट्टी व व्यवस्थापन अधिकारी हुकूमचंद धामी यांना नोटीस बजावत रिसॉर्ट सीलबंद केले.
कोट...
कोविड विषाणू साथीचा रोग प्रादुर्भाव प्रतिबंध कायद्यानुसार जिल्ह्यात सर्व हॉटेल्स, ढाबे, रिसॉर्ट इत्यादी गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असताना शासन नियमांचे उल्लघंन केल्याने कारवाई करण्यात आलेली आहे. पुढील आदेशापर्यंत रिसॉर्ट बंद राहील. अन्य सर्व हॉटेल व्यावसायिकांनी शासन नियमांचे उल्लघंन करू नये.
- सचिन पाटील,
पोलीस अधीक्षक
फोटो- ३१ इगतपुरी रिसॉर्ट
इगतपुरीतील विवांत रिसॉर्ट येथे सीलबंद कारवाई करताना
पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले,
तहसीलदार परमेश्वर कासुळे, मंडल अधिकारी सुरेंद्र पालवे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील आदी.
===Photopath===
310521\31nsk_68_31052021_13.jpg
===Caption===
फोटो- ३१ इगतपुरी रिसॉर्ट इगतपुरीतील विवांत रेसॉर्ट येथे सिलबंद कारवाई करतांना पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, तहसिलदार परमेश्वर कासुळे, मंडल अधिकारी सुरेंद्र पालवे, सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील आदी.