शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

विठू माउली संगे कपिकुलात उद्या रंगणार प्रगटदिन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:55 IST

श्री कपिकुल सिद्धपीठम नाशिक येथे दरवर्षीप्रमाणे श्री श्री मुख्यदेव श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १००८ श्री महंत तपोमूर्ती सद््गुरू श्री वेणाभारती महाराज यांच्या आशीर्वादाने व उत्तराधिकारी कार्याध्यक्ष कृष्णमै यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम येत्या २५ रोजी संपन्न होणार आहे.

पंचवटी: श्री कपिकुल सिद्धपीठम नाशिक येथे दरवर्षीप्रमाणे श्री श्री मुख्यदेव श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १००८ श्री महंत तपोमूर्ती सद््गुरू श्री वेणाभारती महाराज यांच्या आशीर्वादाने व उत्तराधिकारी कार्याध्यक्ष कृष्णमै यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम येत्या २५ रोजी संपन्न होणार आहे.यंदाच्या वर्षीच्या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे उद््घाटन व संपादिका सद््गुरु वेणाभारती महाराज लिखित कपिकुल या त्रैमासिकाचे प्रकाशन विठू माउली फेम अभिनेता अजिंक्य राऊत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.कपिकुल आश्रम पंचवटी येथून पालखी प्रस्थान होऊन गोदाघाट येथे दि. २५ रोजी सकाळी ९ वाजता कार्यक्र म संपन्न होणार आहे. पुरोहित संघातर्फे श्रींच्या पादुकांचे गोदघाट येथे पूजन करण्यात येणार आहे.आध्यात्मिक, मानसिक उन्नतीसाठी प्रकाशित होणाऱ्या मासिकात श्री गुरूंची भारतभर १९ वर्षांत झालेली हजारो प्रवचने व त्यामधील आध्यात्मिक ज्ञान मेजवानी वाचकांस मिळणार आहे. हा उत्सव पंचवटीतील श्रीकपालेश्वर मंदिराजवळील श्री गजानन महाराज मंदिर श्री कपिकुल सिद्धपीठम येथे होईल.उत्सवादरम्यान दिवसभर महाप्रसाद, लहान मुलांचे श्री गजानन विजयग्रंथ पारायण आणि भजनी मंडळ कार्यक्र म होणार आहे. दि. २७ रोजी कपिकूल येथे दरवर्षीप्रमाणे सकाळी ११ वाजता श्री दासनवमी उत्सवानिमित्त श्रीगुरूंचे श्री दासबोधामधील सत्वगुण विषयावर प्रवचन होईल व त्यानंतर श्रीगुरूंहस्ते भाग्यदायी अशी संन्यासी झोळीतील अमूल्य भिक्षा सर्वांना दिवसभर वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कपिकुल उत्तराधिकारी कृष्णमयी यांनी केले आहे.पाथर्डी फाटा परिसरातही कार्यक्रमगजानन महाराज बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पाथर्डी फाटा परिसरातील गजानन महाराज मंदिरात प्रगट दिन सोहळ्याचा कार्यक्रम सोमवारी होणार आहे. सकाळी ८ वाजता पाथर्डी फाटा परिसरात पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असून, दुपारी १२.३0 वाजता मंदिरात महाआरती होणार आहे. सायंकाळी ४ वाजता पाथर्डी फाटा येथे मुक्ताई भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५.३0 ते रात्री ९ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजNashikनाशिक