शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

युद्धनौकेला भेट दिल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 11:16 PM

मुंबईतील फोर्ड येथील नौसैनिक तळावर भारतीय नौसेनेकडून आय.एन.एस. चेन्नई हे लढाऊ जहाज शालेय विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. नाशिकमधील देवळाली कॅम्पच्या विद्यार्थ्यांनी लढाऊ जहाजाला भेट दिल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला.

नाशिक : मुंबईतील फोर्ड येथील नौसैनिक तळावर भारतीय नौसेनेकडून आय.एन.एस. चेन्नई हे लढाऊ जहाज शालेय विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. नाशिकमधील देवळाली कॅम्पच्या विद्यार्थ्यांनी लढाऊ जहाजाला भेट दिल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला.शालेय विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यदलाची माहिती व्हावी व सैन्यदलात सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी मुंबई येथील फोर्ड परिसरातील नौसेनेच्या तळावर आय. एन.एस. चेन्नई हे लढाऊ जहाज विद्यार्थ्यांना दाखवून त्याची सविस्तर माहिती देण्यात आली. मुंबईमधील शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी नौदलाचा तळ फुलून गेला होता. या उपक्रमात नाशिक येथील देवळाली कॅम्पच्या सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा दिलनवाज वारियावा व सचिव अल्मित्रा पटेल यांनी संस्थेच्या देवळाली हायस्कूलच्या एन.सी.सी., राष्ट्रीय हरितसेना, इतिहास-भूगोल, विज्ञान मंडळ व शाळेच्या प्रिफेट कौन्सिल आदींच्या दीडशे विद्यार्थ्यांना सहभागाची संधी उपलब्ध करून दिली. नौसेना तळावर विद्यार्थ्यांना आय.एन.एस. चेन्नई हे लढाऊ जहाज प्रत्यक्ष दाखविण्यात येऊन त्या कार्यपद्धतीची संपूर्ण माहिती देण्यात आली. जहाजाची अंतर्गत रचना तसेच सुपरसॉनिक ब्रह्मोस मिसाइल्स, पाणबोटविरोधी बराक मिसाईल्स व रडार सिस्टीम, लहान एन. एम. जी. गन्स असून हे जहाज आणि जैविक व रासायनिक हल्ल्यात अत्यंत उपयोगी जहाज असल्याची माहिती जहाजावरील नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.आय.एन.एस. चेन्नई या लढाऊ जहाजाच्या भेटीनंतर विद्यार्थ्यांना गेट वे आॅफ इंडिया तसेच वारसा स्थळ असणारे ताज हॉटेलदेखील दाखविण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या उपसचिव अश्रफी घडियाली, शाळेचे मुख्याध्यापक हेमंत मोजाड, एनसीसीचे प्रमुख योगेश्वर मोजाड, हरित सेनेचे प्रमुख किशोर शिंदे, भूगोल जिओ क्लब प्रमुख वैशाली देसाई, स्मिता पाटील, रु पाली भामरे, अल्मास, अ‍ॅलेस आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी