जिल्हा परिषद शाळेला विविध शालेय उपयोगी वस्तू भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 20:43 IST2019-02-27T20:42:52+5:302019-02-27T20:43:29+5:30
कळवण : नाशिक जिल्हा परिषदेच्या कळवण खुर्द शाळेला कळवण मधील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सामाजिक कार्यकत्यांनी शालेय उपयोगी वस्तू भेट दिल्या.

: जिल्हा परिषद शाळा कळवण खुर्द शाळेला विविध उपयोगी अशा वस्तू भेट देतांना कळवण शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर.
कळवण : नाशिक जिल्हा परिषदेच्या कळवण खुर्द शाळेला कळवण मधील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सामाजिक कार्यकत्यांनी शालेय उपयोगी वस्तू भेट दिल्या.
या वेळी कळवण खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच रत्ना पवार उपस्थित होत्या.
कळवण तालुक्यातील विविध क्षेत्रात करणाऱ्या व्यक्तींनी जिल्हा परिषद शाळा कळवण खुर्द शाळेतील विद्यार्थ्यांना टीव्ही,लॅब, पाईपलाईन, पाण्याची टाकी, साऊंड सिस्टीम, कपाट, घड्याळ, गॅस शेगडी अशा विविध वस्तू भेट दिल्या आहेत.
यावेळी उपसरपंच हितेंद्र पगार, शालेय समिती अध्यक्ष रामचंद्र शिंदे, मुख्याध्यापक धनंजय मालपुरे, शिक्षक श्रीमती एस. यु.गुंजाळ, श्रीमती एस. पी. सोनवणे, पी. के. वाघ, डॉ. तुषार पगार, डॉ. सुनिल पगार, भूषण पगार, अजय मालपुरे, डॉ. सम्राट पवार, नितीन संचेती, जयेश पगार, संदिप घोंगडे, योगेश पगार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.