मराठा क्रांती मोर्चा नियोजन समितीचा दौरा

By Admin | Updated: September 16, 2016 23:47 IST2016-09-16T23:46:54+5:302016-09-16T23:47:43+5:30

मराठा क्रांती मोर्चा नियोजन समितीचा दौरा

Visit of the Maratha Kranti Morcha Planning Committee | मराठा क्रांती मोर्चा नियोजन समितीचा दौरा

मराठा क्रांती मोर्चा नियोजन समितीचा दौरा

 सिन्नर : २४ सप्टेंबर रोजी नाशिक येथे काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी सिन्नर तालुक्यातून जास्तीत जास्त उपस्थिती राहावी यासाठी नियोजन समितीने कंबर कसली असून, त्यासाठी ग्रामीण भागात शनिवारपासून दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शनिवार ते बुधवारपर्यंत नियोजन समिती तालुक्यातील गावोगावी जावून बैठका घेणार आहे. शनिवार (दि. १७) रोजी सकाळी ८ वाजता कुंदेवाडी येथून दौऱ्यास प्रारंभ होणार आहे. कुंदेवाडी, मुसळगाव, दातली, खोपडी, खंबाळे, भोकणी, सुरेगाव, मऱ्हळ, निऱ्हाळे, घोटेवाडी, वावी, पांगरी, धारणगाव व फर्दापूर येथे बैठका घेण्यात येणार आहे. रविवार (दि. १८) रोजी बारागावपिंप्री, सुळेवाडी, पाटपिंप्री, घंगाळवाडी, कोमलवाडी, वडांगळी, खडांगळी, चोंढी, मेंढी, सोमठाणे, सांगवी, दहीवाडी, उजनी, पंचाळे, देवपूर व कीर्तांगळी. सोमवार (दि. १९) रोजी मनेगाव, पाटोळे, डुबेरे, डुबेरवाडी, ठाणगाव, पाडळी, टेंभूरवाडी, हिवरे, गोंदे, नांदूरशिंगोटे, कणकोरी, मानोरी, चास व नळवाडी. मंगळवार (दि. २०) रोजी हरसूले, सोनारी, सोनांबे, कोनांबे, शिवडे, घोरवड, पांढुर्ली, बेलू, आगासखिंड, विंचूरदळवी, वडगाव पिंगळा, चिंचोली, मोह व नायगाव. बुधवार (दि. २१) रोजी दुसंगवाडी, सायाळे, मलढोण, पाथरे, कोळगाव माळ, मिरगाव, झापेवाडी, भरतपूर, कारवाडी, शहा, पुतळेवाडी, शिंदेवाडी, मिठसागरे या गावांना बैठका होणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Visit of the Maratha Kranti Morcha Planning Committee