मालेगाव पंचायत समितीला मुख्याधिकाऱ्यांची भेट
By Admin | Updated: February 4, 2016 22:51 IST2016-02-04T22:50:35+5:302016-02-04T22:51:08+5:30
मालेगाव पंचायत समितीला मुख्याधिकाऱ्यांची भेट

मालेगाव पंचायत समितीला मुख्याधिकाऱ्यांची भेट
मालेगाव : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद
शंभरकर यांनी पंचायत समिती कार्यालयास व तालुक्यातील ग्रामपंचायतींना अचानक भेट देऊन पाहणी केली.
शंभरकर यांनी पंचायत समितीत विभाग प्रमुखांशीही चर्चा केली. जेऊर येथील प्राथमिक शाळेस भेट देऊन डिजिटल ई-लर्निंग शाळेकामी मार्गदर्शन केले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय पाहणी केली. एकाच गावात १० बायोगॅस संयंत्राची पाहणी करुन मार्गदर्शन केले व ग्रामस्थांचे आभार मानले. साकुरी निं. येथील एकलव्यनगर येथे रात्री इंदिरा आवास योजना, अपूर्ण घरकुल असलेल्या लाभार्थ्यांशी चर्चा व दिवाबत्तीची सोय करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्र, मळगाव येथे रात्री अचानक भेट देऊन लसीकरण, औषधोपचार याबाबत संबंधितांना सूचना दिल्या व एक कर्मचारी अनधिकृत गैरहजर असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याकामी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना सूचना दिल्या. यावेळी आनंदराव पिंगळे, गटविकास अधिकारी सोयगावकर, उपअभियंता जि. प. लपा उपविभाग, विस्तार अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)