खर्डे : देवळा तालुक्यातील कापशी या आदर्श गावाला शासनाच्या जलशक्ती अभियान समितीने भेट देऊन येथील पाझर तलावातून लोकसहभागातून जवळपास १८ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आल्याचे पाहून नोडल अधिकारी जयंत खोब्रागडे यांनी समाधान व्यक्त केले. जलशक्ती समितीने देवळा तालुक्यात भेट दिली.या भेटीत समितीने तालुक्यातील दुष्काळी स्थिती, पाणी व चारा टंचाई, सिंचन योजना, पाणी अडवा पाणी जिरवा तसेच लोकसहभागातून झालेल्या गाळ उपसा कामांचा आढावा घेतला. यावेळी या जलशक्ती समितीने आदर्श कापशी गावाला भेट देऊन येथील पाझर तलावातून लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा करण्यात आल्याचे पाहून समितीने समाधान व्यक्त केले.यावेळी जलशक्ती अभियानाचे जिल्हा समन्वयक खैरणार, जलशक्ती अभियान दिल्लीचे तायडे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी महेंद्र बोरसे, तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, जलसंधारण अधिकारी व्ही. जी. पवार, मंडळ कृषी अधिकारी परेश भोये, कृषी सहायक बहीरम, ग्रामविकास अधिकारी वासंती देसले, संघर्ष समाज विकास मंडळाचे अध्यक्ष विष्णू शेवाळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कापशीला जलशक्ती अभियान समितीची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:13 IST