परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

By Admin | Updated: August 14, 2016 01:45 IST2016-08-14T01:41:05+5:302016-08-14T01:45:41+5:30

परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

The vision of Trimbakraj is taken by foreign minister | परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

त्र्यंबकेश्वर : भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री जन. व्ही.के. सिंह (सेवानिवृत्त) यांनी शनिवारी दुपारी बारा वाजेदरम्यान त्र्यंबकेश्वर येथे दर्शनार्थ भेट दिली. त्यांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय होते. परराष्ट्र राज्यमंत्री कोठीद्वारमार्गे मंदिरात प्रवीष्ट झाले.
सोवळे नेसून न गेल्यामुळे त्यांनी गाभाऱ्यातून दर्शन विधी न करता बाहेरून दर्शन घेऊन आरती पुष्पांजली केली. यावेळी नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी पुष्पहार शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. नगराध्यक्षांनी त्यांना त्र्यंबकेश्वर या तीथक्षेत्राबाबत सविस्तर माहीती देऊन त्र्यंबकेश्वरचा समावेश केंद्र सरकारच्या तीर्थक्षेत्र विकास सूचित करावा, अशी मागणी केली़ यावेळी विद्यमान नगरसेवक धनंजय तुंगार, योगेश तुंगार, यात्रा जत्रा व आरोग्य सभापती यशंतव भोये, दिपक लढढा, जयराम मोंढे तसेच भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात विश्वस्त कैलास घुले यांनी शाल, श्रीफळ, प्रतिमा, पुष्पहार देऊन मंत्री महोदयांचा सत्कार केला. योळी समीर वैद्य, राजाभाऊ जोशी आदी देवस्थानचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The vision of Trimbakraj is taken by foreign minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.