शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

व्हिजन अकॅडमीचे स्नेहसंमेलन रंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:19 IST

नाशिकरोड जेलरोड येथील व्हिजन अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, व्हिजन किड्स व व्हिजन अ‍ॅक्टिविटी हब यांचा संयुक्त स्नेहसंमेलन उत्साहात पार ...

नाशिकरोड जेलरोड येथील व्हिजन अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, व्हिजन किड्स व व्हिजन अ‍ॅक्टिविटी हब यांचासंयुक्त स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रशांत दिवे, मंगला आढाव, शेतकरी रुक्मिणीबाई आढाव, मंदाकिनी मुदलीयार, बालाजी सोशल फाउंडेशनचे संस्थापक कैलास मुदलियार, उपाध्यक्ष गिरीश मुदलियार, सचिव सतीशमस्के आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते  दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. पाहुण्यांचा  सत्कार संस्थेच्या अध्यक्ष अ‍ॅड. अंकिता मुदलियार यांनी केला.  स्नेहसंमेलनात व्हिजन किड्सच्या विद्यार्थ्यांनी बॉलिवूड  मसाला या संकल्पनेतून सध्याच्या चित्रपटातील नवोदित कलाकारांच्या गाण्यांवर नृत्य केले. व्हिजन अ‍ॅक्टिव्हिटी हबच्या विद्यार्थ्यांनी मुली व महिला यांनी स्वसंरक्षणासाठी तत्पर  राहावे व संकटाचा सामना करावा यावरील प्रात्यक्षिके सादर केली,  तर शिक्षकांनी मोबाइल फोनचे फायदे व नुकसान यावर नाटिका  सादर केली. व्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशातील नामवंत  व्यक्ती, नेते, शास्त्रज्ञ आदींच्या कर्तृत्वाला उजाळा दिला.महात्मा गांधी, महानायक अमिताभ बच्चन, दक्षिणेतील  अभिनेता रजनीकांत, सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित, मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक दादा कोंडके, शाहरूख खान यांच्या गाजलेल्या गाण्यांवर मुलांनी कलाविष्कार सादर केले.  तसेच आंतरराष्ट्रीय धावपटू मिल्खा सिंग, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, संगीतकार ऐ. आर. रहेमान, दिवंगत लोकप्रिय गायक आर. डी.  बर्मन, किशोरकुमार, थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम,  छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर भगतसिंग, शांतीदूत मदर  तेरेसा, जागतिक पॉप सिंगर मायकल जॅक्शन, प्रभुदेवा आदींच्या कर्तृत्वाला उजाळा दिला.  प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनीथा थॉमस, प्रिया आठवले  यांनी केले. सूत्रसंचालन दीपाली भट्टड, अनिता जगताप, सुवर्णा  झलके यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी