विश्वेश भराडियाला आंतरराष्ट्रीय आॅलिम्पियाड विश्वेशचे रौप्यपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:49 IST2018-07-23T00:48:36+5:302018-07-23T00:49:10+5:30

विश्वेश भराडियाला आंतरराष्ट्रीय आॅलिम्पियाड विश्वेशचे रौप्यपदक
नाशिक : इराण येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बायोलॉजी आॅलिम्पियाड या स्पर्धेत नाशिकच्या विश्वेश भराडिया या विद्यार्थ्यांने रौप्यपदक पटकावले आहे. यापूर्वी त्याने राष्ट्रीय बायोलॉजी आॅलिम्पियाड स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याची निवड मुंबई येथील शिबिरासाठी झाली होती. या शिबिरातही विश्वेशने आंतरराष्ट्रीय बायोलॉजी आॅलिम्पियाड स्पर्धेत रौप्यपदक पटकावून नाशिकचा झेंडा सातासमुद्रापार रोवला
आहे. विश्वेशने यापूर्वी नीट परीक्षेत राज्यात चौथे स्थान पटकावले होते. त्यापाठोपाठ एम्समध्ये प्रवेशासाठी झालेल्या परीक्षेतही त्याने यश संपादन केले आहे.