विश्वकर्मा पालखी मिरवणुकीने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:36 AM2018-01-30T01:36:03+5:302018-01-30T01:36:22+5:30

शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. सोमवारी (दि.२९) सोमवार पेठेमधील श्री विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या वतीने सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये सहभागी चित्ररथ मुख्य आकर्षण ठरले.

Vishwakarma Palkhi rally | विश्वकर्मा पालखी मिरवणुकीने वेधले लक्ष

विश्वकर्मा पालखी मिरवणुकीने वेधले लक्ष

Next

नाशिक : शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. सोमवारी (दि.२९) सोमवार पेठेमधील श्री विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या वतीने सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये सहभागी चित्ररथ मुख्य आकर्षण ठरले.  विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा मंदिरापासून पालखी मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अर्चना थोरात, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष विलास सूर्यवंशी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मंदिराचे अध्यक्ष बाळकृष्ण दिघे, दशरथ शिरसाठ, निवृत्ती बोराडे, सुनीता जगताप, प्रज्ञा भालेराव यांसह समाजबांधव उपस्थित होते. टाळ-मृदंगाच्या गजरात मंदिरापासून निघालेली मिरवणूक तिवंधा चौक, मेनरोड, रविवार कारंजा, बोहरपट्टी, सराफ बाजारातून मार्गस्थ होत गोदाकाठावरून नेहरू चौकमार्गे विश्वकर्मा मंदिराजवळ पोहचली. येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीत ‘विश्वकर्मांची किमया, मान्यकरी सारी दुनिया’, ‘बोलो जय विश्वकर्मा’, ‘नवीन पर्व, विश्वकर्मा सर्व’, ‘नाही एक जातीधर्माचा, विश्वकर्मा भूतलावरील सर्वांचा’ अशा विविध घोषवाक्यांचे फलक यावेळी समाजबांधवांनी झळकविले. 
आरतीने दुमदुमले मंदिर
‘जयदेव जयदेव जय विश्वकर्मा, निर्माण केले त्वा अखिल विश्वा... पंचमुख असती कर ते दहा, करि आयुधे ती शोभती पहा...’ या आरतीने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीच्या प्रारंभी पालखीचे पूजन व महाआरतीचे पठण विलास सूर्यवंशी व शैला सूर्यवंशी या दाम्पत्यांनी केले. यावेळी सामूहिकरीत्या उपस्थित समाजबांधवांनी त्यांच्यासोबत आरतीचे पठण केले.

Web Title: Vishwakarma Palkhi rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक