विश्वकर्मा संघटनेच्या अध्यक्षाकडून मारहाण
By Admin | Updated: January 12, 2016 23:26 IST2016-01-12T23:23:40+5:302016-01-12T23:26:26+5:30
विश्वकर्मा संघटनेच्या अध्यक्षाकडून मारहाण

विश्वकर्मा संघटनेच्या अध्यक्षाकडून मारहाण
नाशिक : महाराष्ट्र विश्वकर्मा सेना या संघटनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची कुरापत काढून अध्यक्षाने मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास पाथर्डी फाट्यावरील ज्ञानेश्वरनगरमध्ये घडली आहे़ इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विश्वकर्मा सेनेचे सदस्य म्हणून राजेंद्र खैरनार हे काम करीत होते़ मात्र संघटनेतील अंतर्गत कलहामुळे आठ महिन्यांपूर्वी त्यांनी संघटनेचा राजीनामा दिला आहे़ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संशयित कैलास मोरे हे यामुळे संतप्त झाले व त्यांनी नितीन खैरनार, नंदलाल बाविस्कर, जगदीश बागुल यांच्यासमवेत राजेंद्र खैरनार यांच्या घरी जाऊन कुरापत काढून मारहाण केल्याची फिर्याद सीमा खैरनार यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात केली आहे़
या संशयितांनी मारहाण करण्याबरोबरच जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही खैरनार यांनी फिर्यादित म्हटले आहे़