विंचूरदळवी गाव ठरले ‘स्मार्ट ग्राम’ जिल्हास्तर निवड : दहा लाखांचे पारितोषिक मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:04 IST2018-03-02T00:04:30+5:302018-03-02T00:04:30+5:30
सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी ग्रामपंचायतीने राज्य शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर आयोजित स्मार्ट ग्राम योजनेत बाजी मारली आहे. स्मार्ट ग्राम योजनेत जिल्ह्यातील १६८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता.

विंचूरदळवी गाव ठरले ‘स्मार्ट ग्राम’ जिल्हास्तर निवड : दहा लाखांचे पारितोषिक मिळणार
सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी ग्रामपंचायतीने राज्य शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर आयोजित स्मार्ट ग्राम योजनेत बाजी मारली आहे. स्मार्ट ग्राम योजनेत जिल्ह्यातील १६८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. तालुक्यातील एकमेव स्मार्ट ग्राम म्हणून विंचूरदळवीची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला १० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्मार्ट ग्राम योजनेसाठी पाच निकष तयार करण्यात आले होते. स्वच्छतेच्या निकषात वैयक्तिक शौचालय सुविधा व वापर, सार्वजनिक इमारतीमधील शौचालय सुविधा व वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदींचा समावेश होता. पायाभूत सुविधांमध्ये आरोग्य व शिक्षण सुविधा, शासकीय योजनांची अंमलबजावणी, बचतगट, प्लॅस्टिक वापर बंदी, तर दायित्व निकषात घरपट्टी- पाणीपट्टी वसुली, मागासवर्गीय, महिला व बालकल्याण, अपंगांवरील खर्च, लेखापरीक्षण पूर्तता, ग्रामसभेचे आयोजन आदींच्या आधारे गुण देण्यात आले.सोबतच सामाजिक दायित्व विभागात अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, सौर पथदिवे, बायोगॅस सयंत्रांचा वापर, वृक्षलागवड, संगणकीकरणाद्वारे नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधा, ग्रामपंचायतीचे संकेतस्थळ व सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, आधारकार्ड, संगणक अज्ञावलींचा वापर आदी निकष पूर्ण करणाºया या ग्रामपंचायतींना प्रश्नांनुसार गुण प्रदान करण्यात आले.