व्हिआयपी एम्पलॉईज निवडणूक प्रक्रिया
By Admin | Updated: November 15, 2015 22:56 IST2015-11-15T22:56:15+5:302015-11-15T22:56:27+5:30
व्हिआयपी एम्पलॉईज निवडणूक प्रक्रिया

व्हिआयपी एम्पलॉईज निवडणूक प्रक्रिया
सातपूर : व्हीआयपी एम्प्लॉईज युनियन पदाधिकाऱ्यांच्या सात जागांसाठी मुदतपूर्व निवडणुकीचा कार्यक्रम बुधवार (दि. १८) पासून सुरू होत असून, ५ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गजानन आंबेकर यांची नेमणूक करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहसचिव दोन पदे, खजिनदार, सहखजिनदार अशी सात पदांसाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीत १८ ते २२ नोव्हेंबर अर्ज विक्री व स्वीकृती, २३ नोव्हेंबर अर्ज छाननी, २६ नोव्हेंबर निशाणी वाटप, मतदान व मतमोजणी ५ डिसेंबर घेण्यात येणार असल्याची माहिती युनियन प्रतिनिधींनी दिली.