लैंगिक अत्याचार प्रकरणी सुभेदारावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:46 AM2019-07-25T00:46:18+5:302019-07-25T00:46:43+5:30

आर्टिलरी सेंटरमधील जेसीओ क्लबमधील सुभेदाराने प्रशिक्षणार्थी जवानावरच अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Violence against sex offender | लैंगिक अत्याचार प्रकरणी सुभेदारावर गुन्हा

लैंगिक अत्याचार प्रकरणी सुभेदारावर गुन्हा

googlenewsNext

नाशिकरोड : आर्टिलरी सेंटरमधील जेसीओ क्लबमधील सुभेदाराने प्रशिक्षणार्थी जवानावरच अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित महेश पांडे यास पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़
आर्टिलरी सेंटरमधील रिक्रूट युवकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या १३ जुलै रोजी जेसीओ सुभेदार महेश पांडे यांच्या खोलीत दुपारी ४ वाजता सेवक म्हणून कामावर गेलो. यावेळी पांडे यांनी रिक्रूट सेवकास पाय खूप दुखत आहे असे सांगत कपाटावरील तेलाची बाटली काढण्यास सांगून मॉलिश करण्यास सांगितले. रिक्रूट सेवक पायाची मॉलिश करत असताना पांडे यांनी अचानक उठून रिक्रूट सेवकास बेडवर बळजबरीने झोपवून तुझी ड्यूटी माफ करतो, तुला परीक्षेत पास करतो असे म्हणत बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर पुन्हा १५ जुलैला वरिष्ठांच्या आदेशानुसार पांडे यांच्याकडे सेवकाची ड्यूटी करण्यास गेलो असता पुन्हा बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. यावेळी पीडित रिक्रूट सेवकाचा मित्र विनिश विशिष्ट हा त्याला शोधण्यास आला असता पांडे यांनी त्या सेवकास बेडखाली लपण्यास सांगून बाहेर कोण आले बघण्यास गेले. त्यानंतर पांडे घरात येऊन त्या सेवकास तू जर कोणाला सांगितले तर बघ असा दम दिला. याबाबत पीडित रिक्रूट सेवकाने आपल्या वरिष्ठांना सदर प्रकाराची माहिती दिल्यानंतर या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Violence against sex offender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.