नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:56+5:302021-09-04T04:18:56+5:30

इंदिरानगर : कोरोना संसर्ग होऊ नये याची सर्व गणेश उत्सव मंडळांनी खबरदारी घेत शासनाने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन ...

Violators will be prosecuted | नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

इंदिरानगर : कोरोना संसर्ग होऊ नये याची सर्व गणेश उत्सव मंडळांनी खबरदारी घेत शासनाने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करावे अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी इंदिरानगर भागातील गणशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

गणेशोत्सवानिमित्त इंदिरानगर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या वेळी परिसरातील रस्त्यांना पडलेले लहान-मोठे खड्डे महापालिकेने बुजवावे, मंडळांनी सॅनिटायझरची व्यवस्था करावी तसेच मास्कशिवाय कोणालाही परवानगी देऊ नये, महावितरण कंपनीने गणेशोत्सव काळात वीजपुरवठा अखंड ठेवावा, शासनाकडे प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी मंडळांचे म्हणणे मांडावे, टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशा विविध मागण्यांसह काही सूचनाही माजी नगरसेवक सुनील खोडे, ॲड. भानुदास शौचे, संतोष कमोद, सुधीर गायधनी यांच्यासह गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत केल्या. यावर परोपकारी यांनी चौकाचौकात व परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर गस्ती वाढवून टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन देतानाच शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करण्यासोबतच मंडळांनी गर्दी होऊ न देता खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या. या वेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, साहाय्यक अभियंता मंगेश सोनगिरे उपस्थित होते. रामचंद्र जाधव यांनी आभार मानले.

030921\03nsk_27_03092021_13.jpg

इंदिरानगर गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत पोलिसांचा इशारा

Web Title: Violators will be prosecuted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.