शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंदीवर जिल्हा परिषद शाळा टाकळी विंचूरने केली मात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 18:41 IST

लासलगाव : कोविड १९ मध्ये शाळाबंदी झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या टाकळी विंचूर शाळेने शाळा बंद असूनही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिलेला नाही.यासाठी आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही पद्धतींचा सुरेख मेळ शाळेने घातला आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन - आॅफलाईनचा साधला सुरेख मेळ

लासलगाव : कोविड १९ मध्ये शाळाबंदी झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या टाकळी विंचूर शाळेने शाळा बंद असूनही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिलेला नाही.यासाठी आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही पद्धतींचा सुरेख मेळ शाळेने घातला आहे.शाळेतील सर्व शिक्षक व पालक यांचे आॅनलाईन टूल्सचे प्रशिक्षण घेतले. सर्व शिक्षक गुगलमीटवर जुलैपासून रोज क्लासेस घेत आहेत. एकूण ४० पटापैकी १४० पेक्षा अधिक विद्यार्थी रोज गुगलमीटवर आॅनलाईन क्लासेससाठी हजर असतात. मोबाईल नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोबाईल मित्र ही संकल्पना राबवून अधिक विद्यार्थी शिक्षण प्रवाहात आणले आहेत.आॅफलाईन विद्यार्थीसंख्या निश्चित झाल्यावर मुख्याध्यापक वाळीबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मळेवस्ती, शाळा परिसर व चंदनवाडी या भागात सकाळी ९.३०ते११.३० ह्या वेळेत अध्ययन केंद्रे सुरु केलेली आहेत. याठिकाणी मास्क, सॅनिटायजर्स व सोशल डिस्टंसिंगचे पालन करून रोज अध्यापन सुरू आहे. परशुराम ठाकरे, पृथ्वीराज भदाणे व गजानन उदार आॅफलाईन वर्ग भरवित आहेत.आॅनलाईन व आॅफलाईन पद्धतीने शिक्षण चालू ठेवण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब मोकाटे व सर्व सदस्य तसेच शाळेतील शिक्षक संजय देवरे, बायजा भदाणे, विमल केकाण, प्रगिता अहिरे व सुरेखा बेंडके सातत्याने प्रयत्नरत आहेत. शाळा बंद असली तरी शिक्षण चालू असण्यासाठी प्रयत्न करणाºया जिल्हा परिषद टाकळी विंचूर शाळेचे परिसरात कौतुक होत आहे.कोट्स:शाळेतील सर्व शिक्षक आॅनलाईन व आॅफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन करत असल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे. शालेय व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत प्रशासनाकडून आॅक्सीमीटर व थर्मल स्कॅनर घेण्यासाठी प्रयत्नरत आहे. जेणेकरु न अध्ययन केंद्रे अधिक सुरक्षित होतील.- बाळासाहेब मोकाटे, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष,जिल्हा परिषद शाळा टाकळी विंचूरआम्ही जूनअखेर आॅनलाईन व आॅफलाईन विद्यार्थ्यांचे वर्गीकरण केले. शाळेतील सहकारी,पालक व केंद्रातील शिक्षकांना आॅनलाईन टूल्सचे प्रशिक्षण दिले. याशिवाय जिल्ह्याच्या कंटेट विकसन ग्रुपद्वारे व्हिडिओ व वर्कशीट निर्मिती केली. अध्ययन केंद्र ह्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आॅफलाईन विद्यार्थीही आज शिक्षण घेत आहेत.- गजानन उदार,तंत्रस्नेही शिक्षक. 

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण