विंचूरला नाफेडमार्फत कांदा खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:11 IST2021-06-03T04:11:08+5:302021-06-03T04:11:08+5:30

सध्या येथील उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून कांदा काढणी होऊन बाजारात येणाऱ्या कांद्याला अपेक्षित दर ...

Vinchur buys onions through NAFED | विंचूरला नाफेडमार्फत कांदा खरेदी

विंचूरला नाफेडमार्फत कांदा खरेदी

सध्या येथील उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून कांदा काढणी होऊन बाजारात येणाऱ्या कांद्याला अपेक्षित दर नाही. त्यामुळे नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, सचिव वाढवणे, बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक पंढरीनाथ थोरे, शिवनाथ जाधव, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, दीपक खैरे, गोपी जाधव यांसह कांदा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कांदा खरेदीस प्रारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमध्ये बाजार समितीचे कामकाज बंद असल्याने कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहेत. अशातच चांगले भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. कांद्याच्या भावात सुधारणा होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी विंचूर उपबाजार आवारात नाफेडतर्फे कांदा खरेदीला प्रारंभ करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

-----------------------------

विंचूर उपबाजार आवारात नाफेडतर्फे कांदा खरेदीला प्रारंभ करताना पंढरीनाथ थोरे, सचिन वाढवणे, साधना जाधव आदी. (०२ विंचूर)

===Photopath===

020621\02nsk_2_02062021_13.jpg

===Caption===

०२ विंचूर

Web Title: Vinchur buys onions through NAFED