शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी विमल गाढवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 15:02 IST

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या विमलबाई नामदेव गाढवे यांची निवड करण्यात आली. मावळत्या उपसभापती जिजाबाई नाठे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी ही निवड करण्यात आली.

ठळक मुद्देआवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने पदरिक्त

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या विमलबाई नामदेव गाढवे यांची निवड करण्यात आली. मावळत्या उपसभापती जिजाबाई नाठे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी ही निवड करण्यात आली.

इगतपुरी पंचायत समीतीचे सभापती पद हे आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असल्याने उपसभापती पदाला विशेष महत्व आहे. त्यामुळे जिजाबाई नाठे यांनीही आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्कंठा होती. त्यासाठी शिवसेनेच्याच सौ विमलबाई गाढवे यांच्या नावाची प्रारंभीपासूनच चर्चा होती. त्याच चर्चेवर शिक्कामोर्तब झाले.तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या अध्यक्षतेखाली व सभापती जया कचरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने गाढवे यांची निवड जाहीर करण्यात आली. निवडणुकीस सहायक म्हणून गटविकास अधिकारी डॉ लता गायकवाड सहायक बीडीओ भरत यंदे, आदीनी काम पाहिले. या निवडीप्रसंगी माजी आमदार शिवराम झोले, जनार्धन माळी, निवृत्ती जाधव, हरिदास लोहकरे , सुनिल वाजे, संपत काळे, कचरू डुकरे, पांडुरंग ब-हे, नंदलाल गाढवे, नामदेव गाढवे मोहन ब-हे, राजू नाठे, रघुनाथ तोकडे, मधुकर कोकणे, हरिभाऊ वाजे, पांडुरंग गाढवे, पांडुरंग शिंदे, बाळासाहेब सुराणा, देविदास जाधव, केरू पा देवकर उपस्थित होते.एकाच गटाचा योगायोग इगतपुरी तालुक्यात टाकेद - खेड गट हा नेहमीच प्राबल्यवाण ठरत असतो. निवडणुकीतही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या गटाने एकहाती विजय मिळविला होता. विशेष म्हणजे याच गटातील सौ जया कचरे या सभापती आहे तर सौ विमल गाढवे यांच्या रूपाने उपसभापतीपदही त्याच गटाकडे गेल्याने तालुक्याची धुरा व विकासाचा गाडा आता खेड गटाकडे असणार हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे हा योगायोग आहे. सिंधुबाई वाजे यांच्यानंतर दहा वर्षाने विमलबाई गाढवे यांना उपसभापतीपद पूर्व भागाकडे गेले.(२६ घोटी १)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक