बिबट्याच्या भीतीने धास्तावले शीलापूरचे ग्रामस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:15 IST2021-01-25T04:15:14+5:302021-01-25T04:15:14+5:30
शीलापूर शिवारात गेल्या २० दिवसांत तीन ठिकाणी बिबट्याने शेतकऱ्यांच्या शेळ्या व गुरांवर हल्ला करून फस्त केले. वसंत भिवा बर्वे ...

बिबट्याच्या भीतीने धास्तावले शीलापूरचे ग्रामस्थ
शीलापूर शिवारात गेल्या २० दिवसांत तीन ठिकाणी बिबट्याने शेतकऱ्यांच्या शेळ्या व गुरांवर हल्ला करून फस्त केले. वसंत भिवा बर्वे यांच्या तीन शेळ्या पहाटेच्या सुमारास बिबट्याने ठार केल्या तर गणपत गुले यांची एक शेळी रात्री आठ वाजेच्या सुमारास ठार केली. शुक्रवारी मधुकर शिवराम कहांडळ यांच्या गोठ्यात शिरुन बिबट्याने वासरू ठार केले. या सर्वांचे पंचनामे वनविभाग अधिकारी ठाकरे यांनी केले. शीलापूर येथील भाऊसाहेब खुर्दळ यांच्या घराशेजारी कुटुंबीयांंनी बिबट्या पाहिल्याने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. रात्री-बेरात्री घराबाहेर पडू नका, अगदीच महत्त्वाचे असेल तर बॅटरी व काठी हातात घेऊन कोणीतरी सोबतीला घेऊन बाहेर पडा, लहान मुलांना एकटे सोडू नये. घराच्या चोहोबाजूने प्रखर प्रकाश राहील, याची काळजी घ्या, शक्यतो शेतातून जाता येताना आवाज करावा, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
आर फोटोवर २३ फॉरेस्ट
फोटो- शीलापूर शिवारात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लावलेला पिंजरा. सोबत ग्रामस्थ.