ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा

By Admin | Updated: January 4, 2016 23:58 IST2016-01-04T23:39:47+5:302016-01-04T23:58:42+5:30

प्रभाग बैठक : शासकीय विभागाबाबत मांडल्या तक्रारी

The villagers have read the problem | ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा

ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा


उस्मानाबाद : तालुक्यातील शिंगोली तांड्यावर सोमवारी रात्रीच्या सुमारास तुफान दगडफेक झाली असून, एका घरात घुसून घरातील मंडळींना मारहाण करण्यात आली़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता़
शिंगोली तांडा येथे मागील दोन दिवसांपासून काही इसमांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती़ मात्र, त्यानंतर सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानकच तांड्यावर दगडफेक सुरू झाली़ दोन्ही बाजूंनी दगडफेक होत असल्याने एकच गोंधळ उडाला. तर एका घरातील काही लोकांना घरात घुसून मारहाण झाल्याचे समजते़ मात्र, कोणत्या कारणावरून ही घटना घडली, हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही़ शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून धरपडक सुरू केली होती़ याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़

Web Title: The villagers have read the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.