शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावरच केले वृक्षारोपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 18:37 IST

येवला तालुक्यातील पाटोदा गटातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे गेल्या अनेक  वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्ती करावी यासाठी ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहे मात्र या मागणीला अधिकारी वर्गाने तसेच लोकप्रतिनिधी देखील लक्ष देत नसल्याने याचा निषेध म्हणून पाटोदा येथील ग्रामस्थांनी पाटोदा पिंपळगाव लेप या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष  उस्मान शेख उपसरपंच साहेबराव बोराडे यांच्च्या नेतृत्वाखाली  वृक्षारोपण करूनयात करण्यात येऊन संबधित खात्याचा तसेच लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला .

नाशिक - येवला तालुक्यातील पाटोदा गटातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे गेल्या अनेक  वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्ती करावी यासाठी ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहे मात्र या मागणीला अधिकारी वर्गाने तसेच लोकप्रतिनिधी देखील लक्ष देत नसल्याने याचा निषेध म्हणून पाटोदा येथील ग्रामस्थांनी पाटोदा पिंपळगाव लेप या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष  उस्मान शेख उपसरपंच साहेबराव बोराडे यांच्च्या नेतृत्वाखाली  वृक्षारोपण करूनयात करण्यात येऊन संबधित खात्याचा तसेच लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला .आंदोलन करूनही या गटातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला प्रारंभ न केल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता येवला पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.  पाटोदा हे परिसरातील गावांचे मुख्यबाजारपेठेचे ठिकाण आहे मात्र या गावाला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे त्यामुळे दळण वळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे पाटोदा ते पिंपळगाव लेप पाटोदा ते आडगाव रेपाळ, कातरणी मुरमी,पाटोदा ते विखरणी पुढे विसापूर कातरणी पाटोदा ते दहेगाव, पाटोदा ते शिरसगाव वळदगाव या सह सर्वचरस्त्यांची अतिशय दैनावस्था झाली आहे या सर्वच मार्गावर संपूर्ण रस्त्यांवर मोठमोठी खड्डे निर्माण झाली आहेत या सर्वच रस्त्यांची दुरुस्ती करून दळण वळणाचा प्रश्न सोडवावा या साठी प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी गेल्या अनेक  वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला मात्र संबधित अधिकारी व लोकप्रतिनिधीनाही हा महत्वाचा प्रश्न सोडविण्यास  दुर्लक्ष केल्याने  निषेध म्हणून पाटोदा पिंपळगावलेप या  रस्त्यांवर वृक्षारोपण करण्यात येऊन निषेध करण्यात आला . या वृक्षारोपण आंदोलन प्रसंगी उस्मान शेख,उपसरपंच साहेबराव बोराडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बोराडे,सुर्यकांत गोसावी,युसुफ नाईकवाडी,माजी ग्रामपंचायत सदस्य संपत बोरनारे,शिवाजी वाघ,ज्ञानेश्वर कुंभारकर,साहेबराव निर्मळ,लाखां पगारे,शशिकांत पगारे,संजय जाधव,बाबासाहेब भुसारे,रेवणनाथ जाधव,भास्कर निर्मळ,सुभाष निर्मळ,बालम देशमुख,इम्तियाज देशमुख,गोरख निर्मळ,संजय कुऱ्हाडे,अहमद शहा,आण्णा शिंदे,मुनिरबाबा देशमुख,नईम देशमुख,नामदेव भोकनळ, नवनाथ निर्मळ,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. पाटोदा जिल्हा परिषद गटातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे याबाबत वारंवार मागणी करूनही जनतेच्या या महत्वाच्या प्रश्नाकडे सर्वांनीच डोळेझाक करून दुर्लक्ष केल्याने तसेच प्रशासनाला या वृक्षारोपण करण्याबाबत इशारा देऊनही याची दाखल घेतली गेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र दिनी पाटोदा ते पिंपळगाव लेप या रस्त्यावरील खड्यात  वृक्षारोपण करण्यात येउन निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- उस्मान शेख, पाटोदा

टॅग्स :Nashikनाशिकnewsबातम्याMaharashtraमहाराष्ट्र