लसीकरण शिबिराची ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:56 IST2021-05-18T22:36:28+5:302021-05-19T00:56:21+5:30

देवळा : तालुक्यातील गुंजाळनगर गावाची लोकसंख्या विचारात घेऊन येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य नूतन आहेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Villagers demand vaccination camp | लसीकरण शिबिराची ग्रामस्थांची मागणी

लसीकरण शिबिराची ग्रामस्थांची मागणी

ठळक मुद्दे गावात लसीकरणासाठी जनजागृती मोहीम

देवळा : तालुक्यातील गुंजाळनगर गावाची लोकसंख्या विचारात घेऊन येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य नूतन आहेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गुंजाळनगर येथे कोरोनाचा प्रकोप झाल्यानंतर आरोग्य विभागाने यापूर्वी गावात लसीकरणासाठी जनजागृती मोहीम व शिबिराचे आयोजन केले होते. त्यास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. परंतु गावाची लोकसंख्या विचारात घेता अनेक नागरिकांचे लसीकरण झालेले नाही तरी पुन्हा गावात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी विनोद आहेर, प्रवीण गुंजाळ, प्रकाश शिरसाठ, अनिल भामरे, माजी सरपंच सतीश गुंजाळ, समीर भावसार, जगन्नाथ गुंजाळ आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Villagers demand vaccination camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.