शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

विद्युतपंप चोरणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी पकडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 18:33 IST

चांदवड तालुक्यातील पन्हाळे परिसरात विहिरीवरील वीजपंप चोरणाºया तिघांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले व चांदवड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून विद्युतपंपासह चार किलो तांब्याच्या तारी, वायर व इतर साहित्य जप्त केले आहे.

चांदवड : तालुक्यातील पन्हाळे परिसरात विहिरीवरील वीजपंप चोरणाºया तिघांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले व चांदवड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून विद्युतपंपासह चार किलो तांब्याच्या तारी, वायर व इतर साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, संशयित तिघांना चांदवडचे न्यायाधीश के.जी. चौधरी यांच्या समोर उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.पन्हाळे येथील शेतकरी राजेंद्र शिवाजी सोनवणे हे गुरुवारी (दि. ८) रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील विहिरीकडे गेले तर त्यांना चार-पाच अज्ञात व्यक्ती भ्रमणध्वनीच्या प्रकाशात मोटारसायकलवर काहीतरी ठेवताना दिसले. त्यांनी परिसरातील नागरिकांना माहिती दिली. ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली असता चोरट्यांनी दुचाकीवरून पन्हाळे-काजीसांगवी रस्त्याने पळ काढला. ग्रामस्थांनी दुचाकीचा पाठलाग करून तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरांकडून डिस्कव्हर मोटारसायकल (क्र.एमएच १५ डीव्ही ९९७३), वीजपंप, वायर व इतर साहित्य ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांचे अन्य दोन साथीदार दुसºया मोटारसायकलवरून पळून जाण्यात यशस्वी ठरले.याबाबत शेतकरी राजेंद्र सोनवणे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलिसांनी वीजपंप चोरणाºया अजय शिवाजी खरे (२१) , समाधान शिवाजी खरे (२३, रा. पन्हाळे, सुनील नाना गुंजाळ (२३, रा. विटावे) या तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. संशयितांनी परिसरातील अनेक वीजपंप व कांदा चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केले असता संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कैलास जगताप करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी