क्र ांती मोर्चाच्या नियोजनासाठी गावनिहाय बैठका

By Admin | Updated: September 12, 2016 00:35 IST2016-09-12T00:30:00+5:302016-09-12T00:35:43+5:30

ब्राह्मणगाव, नामपूर : मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे पदाधिकाऱ्यांचे आवाहन

Village wise meetings for the planning of Kranti Morcha | क्र ांती मोर्चाच्या नियोजनासाठी गावनिहाय बैठका

क्र ांती मोर्चाच्या नियोजनासाठी गावनिहाय बैठका

नामपूर /ब्राह्मणगाव : नाशिक येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या महामोर्चाच्या नियोजनार्थ ब्राह्मणगाव येथे बैठक संपन्न झाली. बागलाण तालुक्यात गावोगावी या संदर्भात बैठका घेण्यात येत आहेत़
कायद्याच्या गरैवापर, चित्रपट, नाटक यातून समाजाची होत असलेली बदनामी, मराठा आरक्षण आणि मराठा समाजवर होत असलेला अन्याय व अत्याचारविरोधात जिल्ह्यातील मराठा समाजातर्फे दि. २४ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा क्र ांती महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी व विचार-विनिमय करण्यासाठी तालुक्यातील सर्व मराठा नेते व समाजबांधवांची बैठक शिव मंदिर ओट्यावर पार पडली. या बैठकीतून महामोर्चा संदर्भात प्रत्येक गावातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले. मराठा समाजातील मोर्चा अराजकीय असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यात मराठा समाजातील प्रतिष्ठित आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते़
रामचंद्र पाटील
यांच्या नेतृत्वाखाली बैठक
नामपूर : नाशिक येथे मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी बागलाण तालुक्यातून किमान एक लाख समाजबांधन घेऊन जाण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक नेते रामचंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावोगावी बैठका घेण्यात येत आहे.
या बैठकांना जि. प. सदश्स्य शैलेश सूयवंशी, यतीन पगार, प्रशांत पाटील, पुरोषोत्तम बच्छाव, सिंधू सोनवणे, रामचंद्र पाटील, भाऊसाहेब अहिरे, अरविंद सोनवणे, काकाजी रौंदळ, प्रकाश निकम, पांडुरंग सोनवणे, विनोद पाटील, खेमराज कोर, अशोक सावंत, अमोल पाटील यांनी तालुक्यातील गावागावच्या समाजबांधवांना मार्चाची माहिती देत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Village wise meetings for the planning of Kranti Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.