नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे १९ फेब्रुवारीला साजरी होणारी शिवजयंती यावर्षी गावातील सर्व नागरीकांच्या सहमताने एकच शिवजयंती साजरी करण्यात यावी असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.येथील मारूती मंदिरात सरपंच गणपत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला गावातील अनेक ग्रामस्थ तसेच तरूण मोठयÞा संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये शिवजयंती उत्सवाचे नियोजन, सांस्कृतिक कार्यक्र म, विविध स्पर्धा, तसेच नियोजनबद्ध मिरवणूक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे मिरवणूक कालावधीत रस्त्याने येणाऱ्या वाहनांना तसेच नागरिकांना आपल्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले.
‘एक गाव एक शिवजयंती’ उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 17:51 IST