त्रिमूर्ती चौकातील युवकाकडून गावठी पिस्तूल जप्त

By Admin | Updated: July 10, 2017 00:27 IST2017-07-10T00:27:19+5:302017-07-10T00:27:31+5:30

नाशिक : गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सिडकोतील एका युवकाकडून गावठी पिस्तूल व दुचाकी असा ९० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला़

Village pistol confiscated from youth in Trimurti Chowk | त्रिमूर्ती चौकातील युवकाकडून गावठी पिस्तूल जप्त

त्रिमूर्ती चौकातील युवकाकडून गावठी पिस्तूल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवरजवळ सापळा रचून शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सिडकोतील एका युवकाकडून शनिवारी (दि़८) दुपारी गावठी पिस्तूल व दुचाकी असा ९० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला़ भूषण कैलास नांद्रे (२३, त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे़
गुन्हे शाखेचे पोलीस नाईक मोतीलाल महाजन यांना आकाशवाणी टॉवर येथे काळ्या रंगाच्या दुचाकीवरील युवक गावठी पिस्तूल विक्री करण्यास येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार या ठिकाणी सापळा लावून संशयित भूषण नांद्रे यास पकडण्यात आले़ त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व मॅग्जीन तसेच टीव्हीएस कंपनीची वेगो दुचाकी (एमएच १५, डीजी ७०९६) असा ९० हजारांचा ऐवज जप्त केला आहे़ संशयित भूषण नांद्रेविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़

Web Title: Village pistol confiscated from youth in Trimurti Chowk