विल्होळीजवळ आता मिगबरोबरच सुखोई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:12 IST2017-10-04T00:12:02+5:302017-10-04T00:12:07+5:30
नाशिक : शहर सुशोभिकरणासाठी विविध शासकीय आणि खासगी कंपन्या सरसावल्या असून, त्या अंतर्गत विल्होळी जंक्शन येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या वतीने मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांच्या प्रतिकृती उभारल्या जाणार आहेत.

विल्होळीजवळ आता मिगबरोबरच सुखोई!
नाशिक : शहर सुशोभिकरणासाठी विविध शासकीय आणि खासगी कंपन्या सरसावल्या असून, त्या अंतर्गत विल्होळी जंक्शन येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या वतीने मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांच्या प्रतिकृती उभारल्या जाणार आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक शहराच्या प्रवेशद्वाराजवळ विल्होळी येथे अशाप्रकारचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी एचएएल महापालिकेशी करार करणार आहे. विल्होळी येथे महापालिकेच्या वतीने लॅँडस्केपिंग आणि अन्य सुशोभिकरणाची कामे करण्यात येणार होती. मात्र आता ही कामे करण्यासाठी एचएएल तीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे.