शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

विजयोत्सव : रामकुंडासह गांधीनगर व माणिकनगरमध्ये रावणदहनाच्या उत्सवाला लोटली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 21:40 IST

विजयादशमीच्या मुहूर्तावर असत्यावर सत्याचा विजय म्हणून शहरात विविध सार्वजनिक मंडळांच्या व संस्थांच्या वतीने रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

ठळक मुद्देशहरातील गोदाकाठ, गंगापूररोडवरील माणिकनगर, गांधीनगर, राजीवनगर आदि ठिकाणी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहननाशिकच्या ढोल पथकाने आपल्या खास शैलीत ढोलवादन करत वातावरणात रंग भरला. अखेर रामलीलेतील प्रभू रामचंद्राच्या वानरसेनेचा विजय झाला.

नाशिक : विजयादशमीच्या मुहूर्तावर असत्यावर सत्याचा विजय म्हणून शहरात विविध सार्वजनिक मंडळांच्या व संस्थांच्या वतीने रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, नागरिकांची रावणदहन कार्यक्रमाला गर्दी लोटली होती. शहरातील गोदाकाठ, गंगापूररोडवरील माणिकनगर, गांधीनगर, राजीवनगर आदि ठिकाणी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.गंगापूररोड परिसरात माणकिनगरमधील शिवसत्य मैदानावर तुळजाभवानी मंदीर ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवाची सांगता विजयादशमीच्या मुहूर्तावर सुमारे 50फुटी रावणाचा पुतळा दहणाने करण्यात आली . दशमुखी रावणाच्या पुतळ्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती . उपस्थित शेकडो नागरिकांनी रावण दहणापूर्वी रावणासोबत सेल्फी क्लीक केली . दरम्यान, पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी सपत्नीक देवीची पूजा केली. पूजेनंतर रावणाच्या प्रतिकात्मक पुतळा त्यांच्या हस्ते दहन करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, नगरसेवक योगेश हिरे, महेश हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रभू रामचंद्र की जय, बोल दुर्गा माते की जय अशा घोषणांनी मैदान दुमदुमले होते. नाशिकच्या ढोल पथकाने आपल्या खास शैलीत ढोलवादन करत वातावरणात रंग भरला. साडे आठ वाजेच्या सुमारास रावणाचे दहन करण्यात आले.

गांधीनगर येथे ६० फुटी रावण दहन

गांधीनगर येथे नवरात्री निमित्त आयोजित रामलीला नाटीकेचा समारोप हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रावण दहनाच्या कार्यक्रमाने उत्साहात पार पडला.गांधीनगर येथे नवरात्री निमित्त गेल्या ६२ वर्षापासून अखंडपणे रामलीला नाटीका सादर करण्यात येऊन दसºयाच्या दिवशी रावण दहानाने रामलीलेची सांगता होते. गांधीनगर येथील वेल्फेअर क्लबच्या मैदानावर रामलीला नाटीकेमध्ये शनिवारी सायंकाळी सात वाजता सुमारे तासभर प्रभू रामचंद्रांची वानरसेना व रावणाची राक्षस सेना यांच्यात घनघोर युद्धाचे दृश्य थेट मैदानावरच सादर करण्यात आले. यावेळी बाल गोपाळांकडून व उपस्थित नागरिकांकडून प्रभू रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय असा जयघोष सुरू होता. अखेर रामलीलेतील प्रभू रामचंद्राच्या वानरसेनेचा विजय झाला. यावेळी मैदानावर उभारण्यात आलेल्या ६० फुटी रावणाच्या भव्यदिव्य प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या नेत्रदीपक फटाक्याच्या आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले होते.

रामकुंडावर रावणाच्या पुतळ्याचे दहन

पंचवटी : विजयादशमीच्यानिमित्ताने चतु:संप्रदाय आखाडयाच्या वतीने विजयाचे प्रतिक म्हणून रावणाच्या पुतळा दहन करण्यात आला.शनिवारी सायंकाळी श्रीराम, लक्ष्मण, हनुमान, वानरसेना यांची परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. रामकुंडावर मिरवणूकीचे आगमन झाल्यानंतर रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी भाविकांनी सियावर रामचंद्र की जय हो असा जयघोष केला . प्रभुरामाच्या भूमिकेत आदित्य शिंदे, रोहित कोठावदे (लक्ष्मण), विवेकानंद घोडके (हनुमान), छोटूराम आढळकर (रावण), राजू आढळकर (विभीषण), वैभव आवरकर (इंद्रजित), आदींनी भूमिका साकारल्या होत्या.