विजया जाधव यांचे सदस्यत्व रद्द

By Admin | Updated: November 13, 2014 00:06 IST2014-11-13T00:05:22+5:302014-11-13T00:06:08+5:30

विजया जाधव यांचे सदस्यत्व रद्द

Vijaya Jadhav's membership canceled | विजया जाधव यांचे सदस्यत्व रद्द

विजया जाधव यांचे सदस्यत्व रद्द

सिन्नर : पक्षादेशाचे उघडपणे उल्लंघन केल्याप्रकरणी सिन्नर पंचायत समितीच्या माजी उपसभापती व माळेगाव गणाच्या विद्यमान सदस्य विजया संजय जाधव यांचे पंचायत समिती सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिला आहे.
विजया जाधव या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून माळेगाव गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून विजयी झाल्या होत्या. पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली १४ मार्च २०१२ रोजी पंचायत समिती सदस्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या निवडीप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांनी बैठकीस हजर राहून पक्षाचे उमेदवार प्रकाश कदम यांना मतदान करावे, असा लेखी पक्षादेश सर्व सदस्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेता उदय सांगळे यांनी बजावला होता. सौ. जाधव यांची पक्षादेश बजावल्याची स्वाक्षरीही घेण्यात आली होती. याशिवाय सौ. जाधव यांच्या राहत्या घराचे दर्शनी दरवाज्यावर पक्षादेशाची प्रत चिकटविण्यात आली होती.
जाधव या बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांनी पक्षादेश डावलल्याची तक्रार पंचायत समितीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते सांगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. सदर दाव्याची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू होती. याची सुनावणी पूर्ण झाली. त्यात सौ. जाधव या महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६चे कलम ३ नुसार राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सिन्नर तालुका पंचायत समितीचे गटनेते यांनी त्यांच्यावर काढलेला व्हीप (पक्षादेश)चे उघडपणे उल्लंघन केल्याचे सिध्द झाले. त्या कारणाने या कायद्याच्या कलम ३नुसार त्यांचे पंचायत समिती सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी सदर आदेशाची प्रत राष्ट्रवादीचे गटनेते सांगळे व सौ. जाधव यांना तत्काळ बजावून बजावणी अहवाल सादर करण्याचे आदेश निकालपत्रात देण्यात आले आहे. अ‍ॅड. आनंद जगताप यांनी उदय सांगळे यांच्यावतीने बाजू मांडली. (वार्ताहर)

Web Title: Vijaya Jadhav's membership canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.