शिर्के हल्लयानंतर विहीप आक्रमक
By Admin | Updated: February 15, 2017 19:52 IST2017-02-15T19:52:53+5:302017-02-15T19:52:53+5:30
गोहत्त्याबंदी कायद्याला दोन वर्षे पूर्ण होऊनही कडक अंमलबजावणी केली जात नाही़

शिर्के हल्लयानंतर विहीप आक्रमक
नाशिक : गोहत्त्याबंदी कायद्याला दोन वर्षे पूर्ण होऊनही कडक अंमलबजावणी केली जात नाही़ तसेच गोरक्षकांवरील हल्ल्यात वाढ झाली असून, मंगळवारी गोरक्षा कार्यकर्ते मच्छिंद्र शिर्के यांच्यावर मालेगावमध्ये भरदिवसा हल्ला करून त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली़ या घटनेचा निषेध करून राज्यातील गोहत्त्येबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित पावले उचलावीत अन्यथा विश्व हिंदू परिषदेतर्फे आक्रमक आंदोलन केले जाईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी बुधवारी (दि़१५) पत्रकार परिषदेत दिला़
गायकर यांनी सांगितले की, मालेगाव येथील गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांनी गोहत्त्यासाठी जाणारा ट्रक अडवून ११ गोवंशाची सुटका केली़ तसेच ट्रकचालक व मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचा राग मनात धरून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला़ तर पोलिसांनी गोरक्षाचे काम करणाऱ्या शिर्केंवरच गुन्हा दाखल करून प्रमुख आरोपींना मोकाट सोडून दिले़ पोलिसांची ही कृती म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचाच प्रकार आहे़