दक्षता पथकाची कारागृहात झडती
By Admin | Updated: December 10, 2015 23:54 IST2015-12-10T23:54:20+5:302015-12-10T23:54:52+5:30
दक्षता पथकाची कारागृहात झडती

दक्षता पथकाची कारागृहात झडती
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गेली दोन दिवस कैद्यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर गुरुवारी पुणे कारागृह दक्षता पथकाने नाशिकरोड कारागृहात अचानक भेट देऊन झडती घेतली.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मंगळवार, बुधवार दोन दिवस कैद्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले होते. मध्य विभागाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी बुधवारी सायंकाळी कैद्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर व शासनाला त्यांच्या मागण्या कळविण्याचे आश्वासन दिल्यानंतर कैद्यांनी आंदोलन मागे घेतले होते.