ताहाराबाद येथील ग्रामपंचायतीतर्फे दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:26 IST2020-03-28T23:07:10+5:302020-03-29T00:26:19+5:30

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना हाती घेण्यात आले आहेत.

Vigilance by the Gram Panchayat at Taharabad | ताहाराबाद येथील ग्रामपंचायतीतर्फे दक्षता

ताहाराबाद ग्रामपंचायतीतर्फे औषध फवारणी करताना कर्मचारी.

ठळक मुद्देसार्वजनिक बैठकीच्या ठिकाणी ठेवण्यात आलेली बाके काढण्यात आली.

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना हाती घेण्यात आले आहेत. सरपंच किशोर भामरे, विस्तार अधिकारी व्ही. पी. जाधव व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या मार्गदशनाखाली गावात कोरोणा व्हायरस प्रतिबंधित राहवा यासाठी घ्यावयाच्या काळजीविषयी जनजागृतीसाठी दवंडी देण्यात आली. सॅॅनिटायझर व मास वापरायची माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखवली. सार्वजनिक ठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी करून एकत्र येऊ नये यासाठी सार्वजनिक बैठकीच्या ठिकाणी ठेवण्यात आलेली बाके काढण्यात आली. गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. ग्रामसेवक योगेश भामरे व ग्रामपंचायत कर्मचारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Vigilance by the Gram Panchayat at Taharabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.