उमा भारतींकडून ‘त्र्यंबकराज’चे दर्शन

By Admin | Updated: July 10, 2017 21:57 IST2017-07-10T21:57:31+5:302017-07-10T21:57:31+5:30

केंद्रीय जलस्त्रोत आणि नदी विकास मंत्री उमा भारती सोमवारी सायंकाळी त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन पुन्हा रात्री मध्य प्रदेशला रवाना झाल्या.

View of 'Trimbakraj' from Uma Bharti | उमा भारतींकडून ‘त्र्यंबकराज’चे दर्शन

उमा भारतींकडून ‘त्र्यंबकराज’चे दर्शन

नाशिक : केंद्रीय जलस्त्रोत आणि नदी विकास मंत्री उमा भारती सोमवारी सायंकाळी त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन पुन्हा रात्री मध्य प्रदेशला रवाना झाल्या.
केंद्रीय जलस्त्रोत आणि नदी विकास मंत्री उमा भारती या मुंबईहून मंगला एक्स्प्रेसने सायंकाळी पाच वाजता नाशिकरोड रेल्वे स्थानकावर दाखल झाल्या. तेथुन त्या वाहनाने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी रवाना झाल्या होत्या. रात्री साडेअकराला पंजाब मेलने केंद्रीय मंत्री उमा भारती या पुन्हा मध्य प्रदेशातील खांडवा येथे रवाना झाल्या. (प्रतिनिधी)

Web Title: View of 'Trimbakraj' from Uma Bharti